भुसावळ – तालुक्यातील बेलव्हाय येेथील शेतकरी सोपान प्रल्हाद सोनवणे यांच्यावर
कुठलेही एक कारण नसतांना गावातील ४/५ अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवार दिनांक 1 जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.

अधिक माहिती अशी की,बेलव्हाय गावातील रहिवाशी शेतातून काम करून ट्रॅक्टरने घरी परतत असता गावातील ४-५ इसमांनी कुठलाही विचार न करता शेतकरी सोपान प्रल्हाद सोनवणे यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने सायंकाळी ०७ वाजेच्या दरम्यान हल्ला केला.
या हल्ल्यामुळे जखमीच्या डोळ्यातून रक्तस्त्राव सुरू असून जखमी रक्ताने माखलेला अवस्थेत तालुका पोलीस स्टेशनला आल्याने पोलिसांनी उपचारासाठी मेमो देऊन ट्रामा केअर सेंटर ग्रामीण रुग्णालयात रवाना केले आहे .


