भुसावळ -तालुक्यातील कृर्हा पानाचे येथे श्री राजू बडगुजर यांनी त्यांच्या गायत्री बडगुजर मुलची मुलगी परी तिच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त तिच्या हस्ते फळांच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ते म्हणाले ज्या ज्या वेळी मी शेतात राहील त्या त्या वेळी मला हे रोप नातीची नेहमी आठवण देत राहील आणि त्यामुळे मी या रोपांचे संगोपन आणि संवर्धन करेल ही कल्पना पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे नाना पाटील सर यांनी दिली एक चांगला उपक्रम वाढदिवसाची आठवण राहावी यासाठीच हे वृक्षारोपण आज माझ्या नातीच्या हस्ते करण्यात आले आहे .
शैक्षिक आगाज व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील यांनी या वाढदिवसाच्या वृक्षारोपन प्रसंगी सांगितले जे जे प्रसंग आपल्या जीवनात चांगले वाईट घटना घडत असतात त्या त्या प्रसंगी जर आपण वृक्षारोपण केले तर त्या आठवणीसाठी तरी झाड हे जगवीले जाईल त्यांचे संवर्धन व संगोपण केले जाईल कारण ते झाड रोप त्या प्रसंगाची आठवण करून देत असते . यासाठी कोणत्याही प्रसंगी आठवण म्हणून झाडे लावा असे आवाहन त्यांनी केले . या वृक्षारोपण कार्यक्रमाला मनोज कोतवाल निलेश कोतवाल राजू बडजुगर , बडगुजर आजोबा गायत्री बडगुजर मानशी कोतवाल दर्शना कोतवाल सुनिता बडगुजर, पर्यावरण जागर महिला मंचच्या भारती पाटील तसेच अनेक बालगोपालसह अनेक जण उपस्थित होते . या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे



