भुसावळ – शहरातील इंदिरा नगर येथील रेल्वे लाईन जवळ एका २५ वर्षीय अज्ञात तरुणांचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना शनिवार रोजी दुपारी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .

याबाबतीत अधिक वृत्त असे की , येथील रेल्वे लाईनच्या बाजूला खाब क्रमांक 443 जवळ एका अज्ञात 35 वर्षीय तरुणाचां मृतदेह आढळला याबाबत पोलिसांना माहित्ती कळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहचले असता तरूणाचे मानेवर ब्लेडने वार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.


