साकेगाव – साकेगाव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी भाजपाचे अपात्र केलेले ग्रामपंचायत सदस्य कुंदन कोळी यांचे वडील अशोक कोळी यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले असून त्यांचे आमदार संजय सावकारे यांनी तहसील कार्यालयात येऊन शाल पुष्पहार अर्पण करून स्वागत केले
प्रसंगी भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील प्रभारी सरपंच आनंद ठाकरे दिलीप सिंग पाटील बळीराम सोनवणे सुरेश पाटील सुभाष कोळी, ग्रामपंचायत सदस्य सागर सोनवाल गजानन कोळी राजेंद्र पाटील अनिल कोळी आदींची उपस्थिती होती
साकेगाव ग्रामपंचायतवरती भाजपाची सत्ता असून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी भाजपाचे तब्बल पाच उमेदवार अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत
त्यापैकी कुंदन अशोक कोळी यांना काही महिन्यापूर्वी अपात्र करण्यात आले होते त्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीत कुंदन कोळी यांचे वडील अशोक कोळी व बळीराम सोनवणे यांनी भाजपातर्फे अर्ज सादर केल्यानंतर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे हरण्याच्या भीतीने एकही उमेदवार मिळाला नाही
आज दिनांक 23 मे रोजी दुपारी छाननीनंतर भाजपचे बळीराम सोनवणे यांनी माघार घेतल्यानंतर
अशोक कोळी यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी श्री इंगळे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केल्यानंतर
भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला व अशोक कोळी यांचे अभिनंदन केले
या निवडणुकीमुळे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झालेली असून कुंदन कोळी यांना अपात्र केल्याच्या आनंदावर विरजण पडले आहे तर गावातील नागरिकांनी नेहमी सत्याचा विजय होतो अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत
या पोटनिवडणुकीचा परिणाम निश्चित येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर होईल अशी चर्चा गावात रंगलेली आहे



