भुसावळ – हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचवायला पाहिजे कारण शिवसेना सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन मुंबई येथून आलेले गिरीश विचारे यांनी मानले.

शिव सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यात शिव संपर्क अभियान राबविले जात आहे. याच पार्श्वभूमीवर वरणगाव शहरात आज बुधवार सकाळी 11 वाजता शिव संपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा उपसंघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा. धीरज पाटील, युवा जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा, हिप्पी शेठ, शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, अल्पसंख्याक संघटक सईद मुल्लाजी, तालुका संघटक मोहसीन खान, उपशहर प्रमुख सुखदेव धनगर, कालू शर्मा, आबा सोनार, अमर सोनार, माजी ग्रा. पं. सदस्य विलास वंजारी, सुफियान खान, संघटक अबूबकर खान, पंकज चौधरी, भुषण चौधरी, सुनील देवघाटोले, वकील खान, अरबाज पहेलवान, मुद्दूसर खान, नंदू माळी, महिला आघाडीच्या संघटिका योगिता सोनार, जयश्री महाजन, पंकज पाटील, शिवा भोई, सुनील भोई यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


