भुसावळ – शिवसैनिक हा धगधगता निखारा असून शिवसेनेच्या भगव्याखाली सर्वानी मतभेद बाजूला सारून एकनिष्ठपणे एकत्र येवून जोमाने कामाला लागा , प्रत्येक शिवसैनिकाने सैनिकाप्रमाणे कार्य करा असे आवाहन शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केले .
आगामी जि प, पंचायत समिती व पालिका निवडणुकीत शिवसेना पक्ष आणखी बळकट करण्यासाठी तसेच संघटनात्मक बांधणीसाठी तालुक्यातील प्रत्येक गावात, वॉर्डात यासह घराघरात शिवसेना व त्यांचे कार्य पोहचवीण्या करीता शिवसंपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे . या अनुषंगाने येथील तनारिका हॉटेल येथे आयोजित शिवसेना रावेर लोकसभा मतदार संघ पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन करतांना खा माने यांनी शिवसैनिकाना आवाहन केले .
यावेळी व्यासपीठावर जिल्हयात संपर्क अभियानासाठी आलेली लोकाधिकार समिती तसेच संपर्क प्रमुख गिरीश विचारे भुसावळ , सुधीर गडकरी , संजय बच्छाव रावेर , आबासाहेब पतंगे जामनेर , राकेश कांबळी चोपड़ा ,
यांचेसह मिलिंद धनकुरकर , नंदू राणे , संदीप चरफडे, मिलिंद रावराने, राकेश भाटकर , विलास रेडकर , अजित आझम , बबन धीरोडकर , सहदेव तारी ,जिल्हाप्रमुख समाधान महाजन,
महिला आघाडी उषाताई मराठे , यांचेसह गजानन मालपुरे , चंद्रकांत शर्मा , पूनम ब-हाटे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते .
भुसावळ शिवसेना पदाधिकारी यांचेसह माजी शिवसैनिक आदिनी प्रमुख पाहुणे व मान्यवराचे स्वागत केले .
शब्दाना विचारांची जोड़ मिळते तेव्हा बाळासाहेब तयार होतात असे मार्मिक विचार मार्गदर्शन करतांना खा. माने यांनी सांगुन रावेर भुसावळ मतदार संघात शिवसेनेचे कार्य अतिशय चांगले असल्याची पावती दिली . प्रतिकुल परिस्थिती असताना सुद्धा त्यावर मात करून आजही शिवसेनेचा भगवा या मतदार संघात डौलाने फडकतोय ही अभिमानाची बाब आहे . यापुढे सुद्धा गावगावात व घराघरात शिवसेना पोहचवा शिवसेना बळकट व्हावी , पदाधिकारी यांना बळ मिळावे म्हणून एकसंघ होवून कार्य करा , मतभेद व मनभेद मिटवून समन्वय व नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करा असे आवाहनही यावेळी केले . शिवसेना एक परिवार आहे मातृसंस्था असून शिवसैनिक व पदाधिकारी यांच्यात अंतर असता कामा नये, जेष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करा पक्षात नव्याने सहभागी होणाऱ्यांचे स्वागत करा पक्षात शिवसैनिक मुळ गाभा आहे . व्यक्त होताना पक्ष वाढीसाठी व्यक्त व्हा , भगव्या विचारांचे भगव्या झेंड्याखाली कसे येतील याचा विचार करून कार्य करा अंधकार भेदून दुवा व दिवा म्हणून काम करा अश्या सूचना खा माने यांनी करून मार्गदर्शन केले .
शिवसंपर्क अभियान पदाधिकारी व कार्यकर्ते यांना नवीन ऊर्जा देण्यासाठी सुरु केलेले अभियान असून 80 टक्के समाजकारणा प्रमाणे 20 टक्के राजकारण समजून घ्या 20 टक्के राजकारणातिल अडचणी समजून घेण्यासाठी जिल्हय्यात टीम आलेली आहे यात 5 विधानसभा व 10 स्थानिक समिति लोकाधिकार समिति सदस्य आहेत गेल्या 2 दिवसांपासून कार्यरत आहे यात माझा रोजगार माझा अधिकार प्रचार व प्रसार करीत असल्याचे संपर्क प्रमुख विचारे यांनी मनोगतात व्यक्त केले .
अभियान प्रभावीपणे राबवा– समाधान महाजन –
आगामी जि प, पंचायत समिती व पालिका निवडणुकीत
शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचवण्यासाठी, शिवसेनेनं “शिव संपर्क अभियान” सुरू केलं आहे, अशी माहिती जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांनी प्रस्ताविकात देत भुसावळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना व शिवसैनिकाना मार्गदर्शन केले.

शिवसेना उपजिल्हा प्रमुख उपप्राचार्य प्रा. उत्तम सुरवाडे यांनी आपल्या खुमासदार शैलीत बैठकीचे सूत्रसंचालन करून खासदार माने यांचेसह उपस्थितांचे मन जिंकले . बैठकीस नगरसेवक मुकेश गुंजाळ ,धिरज पाटिल , अँड निर्मल दायमा , दीपक धांडे, संतोष सोनवणे , विलास मुळे, गजानन नीले, अबरार ठाकरे , इलियास शेख , छोटू भोई , बबलु ब् -हाटे, नमा शर्मा , सूरज पाटिल , योगेश बागुल , यांचेसह महिला आघाडी व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते .
दरम्यान खा माने व सहकारी यांनी नुकतेच दिवंगत झालेले शिवसेना तालुका प्रमुख स्व नीलकंठ फालक यांचे निवासस्थानी भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन केले .




