:

भुसावळ – भुसावळ शहरानजीक असलेल्या साकेगाव फार्मसी महाविद्यालयातील सात विद्यार्थी यांनी जी-पॅट परिक्षेत यशस्वी होऊन महाविद्यालयाच्याआलेखात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
साकेगाव येथील कै. यशोदाबाई दगडु सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत, कॉलेज ऑफ
फार्मसी महाविदयालयातील शैशणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये जी-पॅट परिक्षेत सात विद्यार्थीनी
यश मिळवले आहे.
या परिक्षेत यश मिळाल्यामुळे उच्च शिक्षण घेऊन संशोधनाकडे वळण्याचा कल असल्याचे
यावेळी सांगितले.
ग्राज्युएट फार्मसी अॅप्टीट्यूट टेस्ट (जी-पॅट) ही एम.फार्मसी प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी
राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा आहे.
या परिक्षेत पवन भारुडे,हर्षल खुनघटकर, शुभम बजाज, वैशाली कोतवाल, धनश्री इंगळे,
वैशाली पाटील, नरेंद्र पाटील यांनी यश मिळविले.
महाविदयालयाच्या प्रगतीच्या आलेखात आणखी एक मानाचा तुरा मुलांच्या यशाने रोवला
गेला आहे. अशी भावना यावेळी व्यवत करण्यात आली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्री. पांडुरंग दगडु सराफ साहेब, तसेच सचिव श्री. संजय
पंडीत इंगळे आणि प्राचार्य पी.आर पाटील सर यांनी अभिनंदन केले.


