श्री स्वामी सेवा केद्रावर आरोप करणार्‍यावर गुन्हा दाखल करा : सेवेकर्‍यांनीं पोलिस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली मागणी :


भुसावळ – गुरुमाऊली व दिंडोरी प्रणित मार्गावर काही नतभ्रष्ट व विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी गंभीर आरोप केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन येथील स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकर्‍यांनी बाजरपेठ पोलिसांना दिले आहे.

याबाबतच्या निवेदनात, काही नतभ्रष्ट तथा विघ्नसंतोषी प्रवृत्ती असलेल्या व्यक्ती प.पु. गुरुमाऊली व दिंडोरी प्रणित मार्ग याबाबत अनेक प्रकारचे गैरसमज तथा भावना विघातक असे वैयक्तिक स्वार्थापोटी अपप्रचाराचे कृत्य करीत आहेत.

अमर पाटील (रा. धुळे, ह.मु. पुणे) यांच्यावर भारतीय दंडसंहिता अंतर्गत कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात यावा. असे निवेदन येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी परिवाराच्या वतीने येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी ऍड. राजेश कोळी माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्यासह सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.