मुंबई- गुवाहाटी एक्सप्रेस एलएचबी डब्यांसह धावणार :


भुसावळ – उत्तम सुरक्षितता आणि प्रवाशांच्या अनुभवासाठी रेल्वेने ट्रेन क्रमांक 15645/15646 लोकमान्य टिळक टर्मिनस – गुवाहाटी एक्स्प्रेसचा शेवटचा रेक कायमस्वरूपी एलएचबी डब्यांसह बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

एलएचबी कोचची सुधारित संरचना असलेली ट्रेन आता दि. २५.५.२०२२ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दि. २२.५.२०२२ पासून गुवाहाटी येथून चालेल.

सुधारित संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ गार्ड्स ब्रेक व्हॅन, १ पँट्री कार आणि १ जनरेटर व्हॅन.