नाहाटा महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा”

भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला यावेळी सेवानिवृत्ती ला आलेले प्रा. डॉ. वाय. के .चौधरी यांच्या हस्ते उप प्राचार्य डॉ. एस .व्ही .पाटील डॉ. ए.डी. गोस्वामी डॉ. बी .एच. बऱ्हाटे डॉ. एन .ई .भंगाळे प्रा. उत्तम सुरवाडे भगवान तायडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी तिरंग्याला मानवंदना दिली आणि शेवटी संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. यावेळी ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ ,संचलित ताप्ती पब्लिक स्कूल तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते उपस्थितांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.सौ. एम. व्ही. वायकोळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले