भुसावळ – मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील रोजा (उपवास ) सुरु आहे .सदर उपवास सोडण्याकरीता येथील हामीसेवा फाउंडेशनच्यावतीने नसरवानजी फाइल ,अमरदीप टॉकीज जवळ आज शुक्रवार रोजी सायंकाळी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन संस्थापक अध्यक्ष रेहान जलील कुरेशी यांचेतर्फे
करण्यात आले होते .
सर्व धर्म समभाव , सामाजिक एकता व सलोखा अबाधित रहावा या उद्देशाने आयोजित इफ्तार पार्टीस प्रारंभी कार्यक्रमस्थळी सामूहिक नमाज पठण करण्यात येवून रोजा खोलण्यात आला .
यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे , आमदार संजय सावकारे ,माजी नगराध्यक्ष रमण भोळे ,प्रा सुनील नेवे , उमेश नेमाडे, मनीष जैन ,माजी नगराध्यक्ष जलील कुरेशी ,ऑल इंडिया जमीयतुल कुरेशी यूथ विंग जिल्हाध्यक्ष यांचेसह माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, हाजी मुन्ना तेली , शेख शफी पहेलवान , शंकर धुमालेकर, सलीम कुरेशी , जगन सोनवणे आदीं मान्यवरांसह हजारों मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते .



