प्रभाग 22 मधील अनियमित पाणी पुरवठ्याविरुद्ध आमरण उपोषणास बसणार :-शिशिर जावळे. मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी :

भुसावळ:-गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भुसावळ प्रभाग 22मधील शहरातील कस्तुरी नगरातील सर्वे नंबर एकशे एकतीस दोन मध्ये, तसेच देना नगर व इतर परिसरात नियमित सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.आणि याबाबत वेळोवेळी सातत्याने माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र, माननीय पाणीपुरवठा मंत्री माननीय नगर विकास सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडे याबाबत तक्रारी केलेल्या आहेत. त्या तक्रारी नंतर मुख्याध्याधिकारी भुसावळ यांनी लाखो रुपये खर्च करून बूस्टर पम्प लावून देण्याचे आश्वासन दिले व तो पम्प बसवीला मात्र तो पम्प यंत्रणा यशस्वी झाली नाहीv या त्यानंतर मात्र आजपावेतो त्यांनी या कडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. भुसावळ नगरपरिषदेने आमची पिण्याच्या पाण्याची कुठलेही ठोस उपाययोजना,व्यवस्था केलेली नाही. यांनी माझ्या एका तक्रारी नंतर एक बुस्टर पम्प बसविले ते हि फक्त फॉर्मॅलिटी म्हणून मात्र ती यंत्रणा कशी काय फ्लॉप गेली? पैश्यांचा अपवय गझाला ? देव जाणे?बूस्टर पम्प लावूनसुद्धा नागरीकाना पाणी का मिळत नाही? महिलांना रात्रं भर जागी राहावं लागतं? हे योग्य आहे का? आणि मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अधिकारी स्पॉट व्हिसीट करून करीत नाहीत,परिसरातील बोगस नळ कनेक्श न चेक करीत नाहीत? पाणी सोडण्याच्या वेळा नियोजन नाही. याबाबत भुसावळ नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या बद्दल वरिष्ठ स्तरावर तक्रारी केल्याने त्यांना माझा प्रचंड राग आलेला आहे. आणि म्हणून ते आमच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करून जाणून बुजून माझ्याशी व्यक्ती द्वेषापोटी राजकीय दबावापोोटी आम्हास पाणीपुरवठा नियमित होण्यासाठी या प्रकारात प्रचंड दिरंगाई करीत आहेत. व आम्हाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवत आहेे. आम्हास पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा त्यांचा शु द्ध हेतूदिसत आहे. या प्रकरणात यांच्यावर कुठ ला तरी राजकीय दबाव दिसत आहे. ते या प्रकरणात चालढकल करीत आहेत. महाशय यांना हे काम होऊ दयायचे नाही आहे. आज पावेतो तक्रार करूनही आम्हाला पिण्याचे पाणी नियमित मिळाल नाही. आम्हाला मुद्दाम वंचित ठेवल जातंय. आमची यांनी पिण्याच्या पाण्यासाठी कुठलीही ठोस व्यवस्था केलेली नाही.स्पॉट व्हिसीट केले ली नाही. असा आरोपही शिशिर जावळे यांनी केलेला आहे त्यामुळे शेवटी हतबल होऊन आता
युद्धपातळीवर पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होऊन परिसरातील नागरिकांना सुरळीत नियमित पाणीपुरवठा व्हावा यासंदर्भात वारंवार वरिष्ठ स्तरावर तक्रारी करूनही वारंवार पिण्याच्या पाण्यासाठी वंचित ठेवणाऱ्या भुसावळ नगर परिषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी, व पाणी पुरवठा अधिकारी यांचेवर त्वरित कारवाई वहोऊन सदर पाणीपुरवठ्याच्या संदर्भात उपयोजना न झाल्यास आमरण उपोषणास बसणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. व याविषयी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी जळगाव , यांना हि तक्रारी केल्या असल्याचे जावळे यांनी कळविले आहे .