भुसावळचे गो सेवक रोहित महाले यांचा राजस्थानात गौरव –
भुसावळ : शहरातील गो सेवक रोहित महाले यांनी केलेल्या निस्वार्थ व प्रामाणिक गो सेवेची दखल घेत राजस्थान येथील पथमेडा येथील मनोरमा गोशाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
पथमेडा येथे नुकतेच दिनांक २१ ते२५ दरम्यान राष्ट्रीय आदर्श गोसेवा प्रशिक्षण शिबिर झाले. यावेळी महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिहयातील भुसावळ येथील गोसेवक रोहित महाले
सहभागी झालें होते
आपापल्या भागातील गोसेवक कशा पद्धत्तीने गो सेवा करतात तसेच जखमी असलेल्या गो मातेची कशी सेवा केली जाते याबाबत चर्चा करण्यात आली.
मुक्या जीवांसाठी रुग्णालय नाही तो पर्यंत पायात चप्पल नाही – रोहित महाले
भुसावळ गो सेवक रोहित महाले यांना अनवाणी पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करीत त्याबाबत विचारल्यानंतर महाले यांनी भुसावळातील मुक्या जीवांसाठी जो पर्यंत रुग्णालय उभारले जात नाही तो पर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा पण केला असल्याचे सांगितल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला शिवाय उपस्थित भावूकही झाले यावेळी गो शाळा अध्यक्षांनी महाले यांना जवळ घेत मिठी मारली. आपले स्वप्न लवकरच पूर्ण होईल व त्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असे आश्वासन त्यांनी महाले यांना दिले. गो मातेला आई मानुन सर्वानी पुढाकार घ्यावा तसेच प्रत्येकाने वेळात वेळ काढुन पथमेडा गो शाळेला भेट देऊन अनुभूती घ्यावी, असे आवाहन प्रसंगी रोहित महाले यांनी केले.



