भुसावळ विभागातील 35 कर्मचारी सेवानिवृत्त :

भुसावळ – रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातुन दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी 35 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मच्यार्याना रेल्वे तर्फे तात्काळ 11 कोटि 37 लाख रुपये त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले.
या सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वे द्वारा वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेन्द्र वडनेरे यांनी केले
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचार्यांचा यथोचित सन्मान वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमा द्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणुन बुरहानपुर , अकोला, भुसावळ ,बडनेरा , मुर्तिजापुर , मनमाड , इ. ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोंल्डर दिलेत. सेवानिवृत्ती बद्दल कर्मचार्यांना अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक रुकमैया मीना , वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी सेवानिवृत्ती बद्दल संबोधित करुन पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी आभार सहाय्यक कार्मिक अधिकारी बि एस रामटेके यांनी मानले .

कार्यक्रम यशस्वितेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले.