नगरपालिकेत बांधकाम परवानगीसाठी विलंब,नागरीक त्रस्त ; नगरविकास राज्यमंत्रींना उमेश नेमाडेंनी दिले पत्र ! –

भुसावळ – भुसावळ नगरपालिकेत बांधकाम परवानगी फाईल दाखल केली असता ३-४ महिने परवानगी मिळणेसाठी विलंब लागत आहे. यामुळे नागरीक त्रस्त झाले आहे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करून नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे पैसे मोजावे लागत आहे.

नागरिकांना होणारा त्रास थांबण्यासाठी जिल्ह्यध्यक्ष ओ.बी.सी सेल राष्ट्रवादी पार्टीचे उमेश नेमाडे यांनी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांना दिनांक : २६/४/२०२२ पत्र दिले आहे.भुसावळ नगरपालिका नाशिक विभागतील एकमेव अ वर्ग नगरपालिका आहे. येथे शहराचे नागरिकीकरण झपाट्याने होत असतांना बांधकामे सुध्दा मोठ्या प्रमाणावर होत असतात त्यासाठी लागणारी परवानगी फाईल दाखल केल्यापासून ३-४ महिने अवधी लागत विलंबाने परवानगी मिळते. यामुळे रोजगारावर तसेच व्यवसायावर परिणाम होत आहे.नगर रचना विभागातील अधिकारी हे न जुमानता त्यांची मनमानी करत शहरातील परवानाधाराक इंजिनियअर यांना चुकीची वागणुक देत त्यांचा

मानसिक त्रास व छळ करत असतात. त्यांच्या अशा वागणुकीमुळे शहरातील विकासावर व चलनावर फरक पडतो. बांधकाम परवानगी फाईल दाखल करतानाच त्याचे शासकीय विकास शुल्क भरणा केला जातो व त्यामुळे नगरपालिकेस वार्षिक करोडे रुपये तिजोरी जमा होतात. तरीही परवानाधारकांची पिळवणूक होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

सदर विषयाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष केंद्रित करुन साहाय्यक नगर रचनाकार यांची रिक्त पदी नियुक्ती करुन ‘ नागरिकांना दिलासा द्यावा.यासाठी जिल्ह्यध्यक्ष ओ.बी.सी सेल राष्ट्रवादी पार्टीचे उमेश नेमाडे यांनी पत्र दिले.