श्री स्वामीनारायण गुरुकुल साकेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी


भुसावळ- साकेगाव, ता.भुसावळ येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम संस्थेचे संचालक ऋषीस्वरूप स्वामी व गोपाळ भगत यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भीम गीते गाऊन तसेच भाषणातून डॉ.आंबेडकर यांच्याविषयी माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांची शैक्षणिक माहिती देऊन संविधानात असलेल्या विविध मुद्द्यांचा उहापोह केला.याप्रसंगी शाळेच्या संस्था सभासदांसह शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.