भुसावळ: – येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री संजीव पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते..
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थिनींच्या मनोगतात इयत्ता 9 वी अ च्या नूतन वारके या विद्यार्थिनींने डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनातील निवडक प्रसंग सर्वांसमोर मांडले. शिक्षक मनोगतात विद्यालयाचे ज्येष्ठ कलाशिक्षक श्री श्रीकांत कानगो यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याचा परिचय आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारोपाच्या मनोगतात विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री संजीव पाटील सर यांनी आपणही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या कृतीत आणले पाहिजे तरच आपले जीवन समृद्ध होईल असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका श्रीमती पल्लवी चौधरी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले….



