वरणगावला महिलेचा विनयभंग : एका विरुद्ध गुन्हा दाखल :

भुसावळ – वरणगाव शहरातील रहिवाशी असलेल्या महिला घरात एकटी असल्याचे पाहून तीच्या घरात प्रवेश करीत विनयभंग केल्याची घटना दि ९ शनिवार रोजी उघडकीस आली असुन याप्रकरणी तरुणास अटक करण्यात आली आहे .
या बाबत वरणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की शनिवार दि ९ रोजी एका भागात रहिवाशी असलेल्या पिडीत महिला रात्री अकरा वाजेच्या सुमारास जेवन झाल्या नंतर आपल्या घराचा दरवाजा बंद करून झोपलली असताना शेजारीच राहणारा तरुण मद्यावस्थेत घरात अनधीकृत प्रवेश करीत महिलेला शरीर सुखाची मागणी करीत दमदाटी केल्याने महिलेने आरडाओरड केली यावेळी शेजारच्यानी त्या घराकडे धाव घेऊन महिलेची सुटका केली
या बाबत पिडीत महिलेच्या फिर्यादी नुसार वरणगाव पोलीस स्टेशनला संशयीत आरोपी संदिप बनवे विरोध भा द वी कलम ३५४ , ५०६ , ५१० , ४५२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मुकेश जाधव हे करीत आहे