भुसावळ – येथील राष्ट्रीय महामार्गावर साकेगाव जवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहे . यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मयत व्यक्तीचे नाव सुनील पाटील, ( जळगाव ) तर जखमींचे नाव सोनू लोंढे , कल्पेश सपकाळे , छोटू खरे तिन्ही रा. जळगाव. ही घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. मेटॅडोर क्रमांक एम .एच . 04 ही गाडी भुसावळ कडून जळगावकडे गिफ्ट घेऊन जात होती . तर विकास दुध वाहतुकीची गाडी एका गाडीला टोचन करून जळगाव कडून भुसावळ कडे येत होती . या गाडी मागे एक कार होती . त्या कारला वाचविण्याच्या प्रयत्नात तीन वाहनांचा अपघात झाला.या अपघातामुळे मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये मयत व्यक्तीचे नाव सुनील पाटील, ( जळगाव ) तर जखमींचे नाव सोनू लोंढे , कल्पेश सपकाळे , छोटू खरे तिन्ही रा. जळगाव.यांचा समावेश आहे
जखमींना तातडीने जवळच्या ट्रामा केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे व वाल्मीक सोनवणे , विठ्ठल फुसे , राजू काझी , पोलीस कर्मचारी वेळेत पोहोचले . जखमींना भुसावळ येथील ट्रॉमा सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .


