प्रा प्रदीप सोलंकी यांना विद्यापीठातर्फे पीएचडी पदवी प्रदान :

जळगाव – श्रम साधना ट्रस्ट संचलीत अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी येथील मेकॅनिकल विभागातील प्रा. प्रदीप मोहनसिंग सोलंकी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी मेकॅनिकल विभागातील ‘एक्सपेरिमेंटल इन्वेस्टीगेशन ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर सिस्टम फोर परफॉर्मन्स एन्हान्समेंट’ या विषयावर शोधनिबंध सादर केला.

त्यांना प्रा. डॉ.डी. एस. देशमुख व प्रा. डॉ. व्ही. आर. दिवरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. के. पटनाईक, उपप्राचार्य डॉ. एस. बी. पवार, सर्व विभागप्रमुख , मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा.एन. के. पाटील, विभागातील प्रा. डॉ. एस. पी. शेखावत, प्रा डॉ.पी. जी. दामले , प्रा.कृष्णा श्रीवास्तव, प्रा. एम. व्ही. रावलानी, प्रा. डी. बी. सदाफळे , प्रा. पी. एन. उल्हे , प्रा. ए .आर. भारद्वाज, प्रा. प्रवीण पाटील , प्रा. एम. व्ही. कुलकर्णी , प्रा. सी. के. मुखर्जी, प्रा. डॉ. पी. पी. बोरनारे , प्रा. डी. सी. तळेले , प्रा. ए. जे. पुरी , प्रा. टी. जी. पाटील तसेच विद्यार्थी व पालकांद्वारे अभिनंदन करण्यात आले .