ब्राह्मण संघातर्फे रंगभूमि दिन उत्साहात संपन्न :


भुसावळ – ब्राह्मण संघा तर्फे जागतिक रंगभूमि दिनाच्या निमित्तानं दि. २७ मार्च रविवार रोजी कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी सात वाजता करण्यात आले होते. यात सुरुवातिला संघाचे उपाध्यक्ष श्री सुनिल पाठक यांनी शिवतांडव स्तोत्रचे पठण केले.
नंतर उपस्थितांनी सामुदायिक नटराज पुजन केले.यावेळी श्री.विजय जोशी (अध्यक्ष), श्री.प्र.ह.दलाल (सचिव) , श्री.सुनील पाठक (उपाध्यक्ष) , श्री.प्रसन्न गंधे , श्री.रविंद्र फडके , श्री.संजय बोचरे , श्री.सुधीर देशपांडे ,सौ.सरीता कुलकर्णी , श्री.हेमंत भोकरडोळे , श्री.पंकज जोशी, रमाकांत भालेराव , शुभम कुळकर्णी , विकी चव्हाण,नाना पाटील, सुरेंन्द्रसिंग पाटील आदि उपस्थित होते.मान्यवरांनी आपली मनोगत मांडले.