भुसावळ – आगामी निवडणुका व रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात कायदा व सुरक्षितता अबाधित राहावी सण उत्सव शांततेत व आनंदाने साजरे व्हावे यासाठी पोलीस विभागाच्यावतीने शहरात मॉक ड्रिल घेण्यात आले.
त्याचप्रमाणे रेल्वेस्थानक व परिसरात ठिकाणी काही स्फोटक वस्तू असेल तर तिचा शोध घेऊन ती नष्ट करणे दृष्टीने मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते .
पोलिस दल सोबत आरसीबी पथक , क्यूआरटी टीम,बिलिडीएस टीम यांनी अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील महत्वपूर्ण धार्मिकस्थळे, कार्यालय, शाळा , आदीच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि तयार आहेत असे उत्कृष्ट प्रात्यक्षिका मधून दाखविले .
आगामी कालावधीमध्ये काही अनूचीत प्रकार घडला तर या ठिकाण आरसिबी टीम ( स्टँड बाय ) क्यूआरटी टीम,बिलिडीएस टीम नगरपालिकेच्या वतीने फायर ब्रिगेड ॲम्बुलन्स सुद्धा
उपलब्ध आहे पालिकेच्या वतीने फायर ब्रिगेड ॲम्बुलन्स सुद्धा तत्पर असते .



