भुसावळ आनंद लॉज प्रकरण : सातही आरोपी सब जेलला रवाना :

भुसावळ – शहरात पांडुरंग टॉकीजच्या बाजूला स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता मुलींना पैशांचे अमिष दाखवून जागा उपलब्ध करू देऊन देह व्यापारास प्रवृत्त करून देह व्यापार करून घेत असल्याची गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी भुसावळातील आनंद लॉज वर छापा टाकून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या गुन्हयातील आरोपीना आजरोजी जळगांव सब जेल रवाना करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी पोहेकॉ रमण सुरळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भुसावळ शहरातील पाडुरंग टॉकीजच्या बाजूला आनंद लॉज मध्ये राजेंद्र मुरलीधर नेमाडे व दीपेन रविंद्र सुरवाडे हे स्वतःचा आर्थिक फायद्याकरीता मुलींना पैशाचे आमिष दाखवून देह व्यापाऱ्यांस प्रवृत्त त्यांना आनंद लॉज मध्ये बोलावून जागा उपलब्ध करून देऊन देह व्यापार करून घेत आहे.या मिळालेल्या माहितीची खात्री करून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड व पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पाडुरंग टॉकीजच्या बाजूला आनंद लॉज मध्ये जाऊन पाहणी केली असता राजेंद्र मुरलीधर नेमाडे राहणार नंदनवन कॉलनी भुसावळ.हरिष नामदेव फालक राहणार गायत्री मंदिरा जवळ भुसावळ.दीपेन रविंद्र सुरवाडे राहणार वानखेडे कॉलनी भुसावळ.शुभम दिनकर बरकले राहणार कुऱ्हा पानाचे.अकबर शहा कादर शहा दीनदयाल नगर भुसावळ. शेख सत्तर शेख जब्बार राहणार विवरे तालुका रावेर. मोहसीन गंभिर पिंजारी राहणार शिरसोली,जळगांव असे इसम व महिला मिळून आले म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनला राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून गुरुन ०२०३/२०२२ भा.द वि.कलम ३७०,३,४,५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरच्या गुन्हयातील आरोपितांना दिनांक २१ रोजी प्रथम वर्ग मा.न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश कोठडी मिळाली असता जळगांव सब जेल रवानगी करण्यात आली आहे.