जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन जिल्हाअध्यक्ष पदी अनिल चौधरीं यांची नियुक्ती :


भुसावळ – जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन नवीन कार्यकारिणी पदाधिकारी (२०२२ ते २०२६) नियुक्ती झाली आहे जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे नुतन जिल्हा अध्यक्षपदी अनिल छबिलदास चौधरी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे , जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन चे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष अनिल चौधरी यांची निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या .
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव राकेश तिवारी यांचेशी एजीएम मध्ये चर्चा करून लवकरच त्यांच्या अध्यक्षतेखाली भव्य अशी महाराष्ट्र राज्यस्तरीय अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा २०२२-२०२३ (ELITE महिला व पुरुष) लवकरच भुसावळ शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे व भरपूर बॉक्सिंग संबंधित कार्यक्रम राबविण्यात येणार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली .
जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन चे नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे यात
सहसचिव – असलम सैय्यद
उपाध्यक्ष- स्वारन संधु
खजिनदार -़ स्टीफन डेवी
सभासद- प्रदीप गायकवाड,
प्रकाश जाधव,महेंद्र मेढे,
सुनील सोनवणे, रमण भोळे(सर) ,आनंद हुसळे,
अॅडव्हाेकेट राजेंद्र मालविया .
जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन मधील जुने पदाधिकारी मिलिंद साळुंके (उपाध्यक्ष) व संजय बांगर (सहसचिव) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष अनिल चौधरी यांनी अन्य पदाधिकारी व सभासद यांच्याशी चर्चा करून शुभेच्छा दिल्या व समाधान व्यक्त केल्याचे जळगाव जिल्हा बॉक्सिंग सेक्रेटरी विजय सोनवणे यांनी कळविले .