रंगात भिजूनी सारे रंगले मनसोक्त धुळवड उत्साहात : चौधरी परिवाराचा मित्रपरिवारासोबत आनंदोत्सव :


भुसावळ – होळी व धुलीवंदनाच्या निमित्त विविध रंगांनी एकमेकांना रंगवत ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रंगात रंगुनी सारे रंगले मनसोक्त अशा पद्धतीने भुसावळ शहरासह परिसरात धुळवड साजरी करण्यात आली. माजी आमदार संतोषभाऊ चौधरी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यासह चौधरी मित्र परिवाराने धुलिवंदनाचा आनंदोत्सव साजरा केला.
संपूर्ण देशभरात दुर्गुणांचे दहन होळीत जाळून आनंदाने व हर्षोल्हासाने सर्वत्र होलिकोत्सव साजरा करण्यात आला. होळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात धुळवडसुद्धा साजरी केली. आज ना छोडेंगे तुझे हमजोली, बस खेलेंगे हम होलीच्या तालावर सर्वत्र उत्साहाने व आनंदाने साजरी करण्यात आली. यंदा बहुतेक ठिकाणी कोरड्या रंगांचा वापर करण्यात आला व पाणी वापरणे सर्वांनी टाळल्याचे दिसून आले. धुळवडीनिमित्त भुसावळ शहर व परिसरातील नागगरीकांसह अबालवृद्धांनी एकमेकांना रंग लावून आपुलकी एकोपा व स्नेह व्यक्त केला तर अनेक ठिकठिकाणी तरुणाईने डीजे च्या तालावर नाचत आनंदाने रंगांची उधळण करीत धुळवडीचा मनसोक्त आनंद लुटला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र होता, यंदा मात्र सर्वांनी आनंदाने होळी व धुळवड साजरी केली.