भुसावळ : मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने मुंबई आणि भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचार्यांसह रेल्वे क्रमांक 11061 मध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते मनमाड विभागात सलग तीन दिवस तिकिट तपासणी मोहीम राबवली. त्यात सर्व जनरल आणि एसी कोच तपासण्यात आले. कारवाईत एकूण 1,223 अनियमित प्रवासी आढळले. त्यांच्याकडून रेल्वेने 10 लाख 33 हजार 250 रुपयांचा दंड वसूल केल्याने प्रवाशांच्या गोटात खळबळ उडाली. प्रवाशांच्या सोयी व सुविधेसाठी तसेच फुकट्या प्रवाशांवर नियंत्रणासाठी अशी संयुक्त कारवाई यापुढील काळातही होईल.



