मुंबई-कानपूर आणि पुणे-जबलपूर दरम्यान साप्ताहिक विशेष ट्रेन च्या फे-यांना मुदतवाढ

भुसावळ – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने मुंबई -कानपूर – मुंबई आणि पुणे- जबलपूर – पुणे दरम्यान पूर्णत: आरक्षित साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील:

04152 लोकमान्य टिळक टर्मिनस – कानपूर साप्ताहिक अतिजलद विशेष दिनांक २.४.२०२२ ते १.१०.२०२२ पर्यंत चालवण्यात येईल.
04151 कानपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक अतिजलद विशेष दिनांक १.४.२०२२ ते ३०.९.१०२२ पर्यंत चालविण्यात येईल.

02131 पुणे – जबलपूर साप्ताहिक अतिजलद विशेष दिनांक २८.३.२०२२ ते २७.६.२०२२ पर्यंत चालवण्यात येईल.
02132 जबलपूर- पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष दिनांक २७.३.२०२२ ते २६.६.२०२२ पर्यंत चालवण्‍यात येईल.

या ट्रेन्सच्या वेळ, संरचना आणि थांबे इत्यादींमध्ये कोणताही बदल होणार नाही.

आरक्षण: साप्ताहिक विशेष ट्रेन क्र. 04152 आणि पूर्ण आरक्षित स्पेशल ट्रेन क्र. 02131 च्या विस्तारित फे-यांची विशेष शुल्कासह बुकिंग दिनांक १६.०३.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

प्रवाशांना आपल्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे.