भुसावळ – श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालय भुसावळ येथील हिंदी विभाग व नागरी लिपी परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगणकात देवनागरी लिपीचा प्रयोग यावरील राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वीरित्या संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती पद्मा मोतीलाल कोटेच्या, अध्यक्ष, श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ, कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. मधु खराटे , पूर्व अध्यक्ष, महाराष्ट्र हिंदी परिषद , कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. प्रेमचन्द्र पतंजली, अध्यक्ष नागरी लिपी परिषद , नवी दिल्ली, प्रमुख अतिथि डॉ. सुनील कुलकर्णी अध्यक्ष, हिंदी अभ्यास मंडळ, कवयित्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विछयापीठ जळगाव आदि उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या मेजर डॉ. मंगला साबद्रा यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाची जडणघडण आणि महाविद्यालयात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. हिंदी विभागामार्फत नेट-सेट परीक्षा, हिंदी पखवडा, आंतरराष्ट्रीय वेबिनार, कार्यशाळा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन सफलतापूर्वक करण्यात आलेले आहे . पुढे म्हणाल्या की हिंदी देवनागरी लिपी हे वैज्ञानिक आणि विश्वातील सर्वश्रेष्ठ लिपी आहे.
महाविद्यालयामध्ये मागील दोन-तीन वर्षांमध्ये हिंदी विभागामध्ये ऑनलाइन कार्यक्रमाअंतर्गत हिंदी साहित्यातील प्रसिद्ध कवयित्री अनामिका, जपानचे प्रोफेसर शामसुंदर पांडे, चीन येथून डॉ. विवेकमनी त्रिपाठी, उबेकिस्थान येथून डॉ. सिरोजोद्दिन, रूस येथुन मॉक्सिको , मुंबई विद्यापीठातील डॉ. दत्तात्रेय मुरूमकर , गुजरात येथील डॉ. हितेश गांधी या सर्व मान्यवरांनी आपले अभ्यासपूर्ण व्याख्याने आमच्या विद्यार्थिनींसाठी दिलेली आहेत. हिंदीचा प्रचार प्रसार करण्यासाठी महाविद्यालयातील हिंदी विभाग सक्षमपणे कार्य करीत आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. प्रेमचंद्र पतंजली यांनी असे प्रतिपादित केले की नागरी लिपी वैज्ञानिक आहे. त्यासाठी संगणकाच्या माध्यमातून प्रयोग करणे आवश्यक आहे. आणि इतर भाषांना सुद्धा नागरी लिपी प्रमाणे समृद्ध करण्याचा प्रयत्न करावे. नागरी लिपी ही देश संघटन करण्यासाठी महत्त्वपूर्ण लिपी आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. मधु खराटे यांनी उद्घाटनाच्या प्रसंगी म्हणाले की राष्ट्राची राजभाषा ही हिंदी असेल आणि तिची लिपी देवनागरी असेल हे स्पष्टपणे राज्यघटनेत नमूद केलेले आहे. देवनागरी ही संगणकाच्या प्रयोगासाठी अनुकूल भाषा आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये करलो दुनिया मुठ्ठी में या वाक्यानुरूप प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल हे साधन आहे. संगणकामध्ये किंवा मोबाईल मध्ये देवनागरी चा उपयोग सहज केला जातो. देवनागरी लिपीमध्ये जसे आपण बोलतो तसे देवनागरी लिपीमध्ये लिहित असतो. इंग्रजी भाषेमध्ये कमी वर्ण असून देवनागरी लिपीची वर्णमाला समृद्ध आहे.
प्रथम सत्राचे व्याख्याते डॉ. विनोद बब्बर, संयुक्त सचिव, नागरी लिपी परिषद , नवी दिल्ली यांनी व्याख्यानात असे म्हटले की हिंदी भाषेला विश्वस्तरावर पोहोचण्यासाठी इतर भाषांचा सुद्धा विकास झाला पाहिजे. आजचे तरुण देवनागरी लिपी पासून दूर आहेत. त्यांना प्रमाणित भाषेचा वापर करण्यास खूप अडचणी निर्माण होतात. त्यामुळे नागरी लिपीतील साहित्याच्या भंडारा पासून वंचित राहात आहे. यासाठी नागरी लिपीचा उपयोग सर्वात अधिक करायला हवा, हाच उद्देश या राष्ट्रीय चर्चासत्राचा आहे.
द्वितीय सत्राचे व्याख्याते डॉ. रंजीत कुमार वरिष्ट अनुवादक, भारतीय रक्षा मंत्रालय, बेंगलूर यांनी संगणकाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात नागरी लिपीचा प्रयोग वाढत आहे. संगणकात नागरी लिपीचा उपयोग त्याचे महत्त्व विशद करताना त्यांनी हिंदीचा रोजगारात क्षेत्रातील उपयोग, व्यापार क्षेत्रातील उपयोग, युनिकॉर्नचे महत्व त्याचप्रमाणे हिंदी भाषेसंदर्भात विविध वेब साईटची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखविली. हिंदी अुनवाद क्षेत्रामध्ये ऑनलाईन फॉन्ट परिवर्तन करण्याचे विविध उप्रकम आहेत. त्याचा वापर करून रोजगाराचे माध्यम निर्माण होऊ शकतात.
समारोप सत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. धनवीज यांनी भूषविले या सत्राचे व्याख्याते डॉ. हरिपाल सिंह यांनी नागरी परिषदेची माहिती देताना नागरी परिषदेमार्फत हिंदी भाषेचा विकास होण्यासाठी विविध उपक्रम योजना यांची माहिती सविस्तरपणे मांडले. नागरी लिपी माफर्त हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी निरंतर कार्य करण्यात येत आहे.
कार्यक्रमांमध्ये कॅनडाहुन ऑनलाईन गोपाल बघेल यांनी राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदवून आपले मत मांडले. ते म्हणाले की कॅनडामध्ये आम्ही हिंदी साहित्याच्या प्रसारासाठी विविध कार्यक्रम करीत असतो. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मला खूप आनंद झाला.
या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये एकूण 300 प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केलेली आहे. कार्यक्रम संपन्न होण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ. जे व्ही. धनवीज, उपप्राचार्य प्रा. वाय.डी. देसले, चर्चासत्राचे संयोजक डॉ. गिरीश कोळी, सह संयोजक प्रा. जाकीर शेख तसेच काही यशस्वीरित्येसाठी प्रा. निलेश गुरुचळ, प्रा. सचिन पंडित, प्रा. विनोद भालेराव, प्रा. मनीषा इंगळे, प्रा. गिरीष सरोदे, श्री. प्रकाश तायडे, प्रा. शितल औतकर, प्रा. पूनम सोनवने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये श्री प्रदीप चौधरी, श्री नितीन चौधरी यांनी परिश्रम घेतले. विशेष बाब म्हणजे या सर्व चर्चासत्राचे सूत्रसंचालन व आभार महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी केले. यामध्ये कु. गायत्री नाटेकर, कु. योगिता सूर्यवंशी कु.यशस्वी नेमाडे कु. वर्षा माळी या विद्यार्थिनींनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा सक्रिय सहभाग या चर्चासत्रामध्ये नोंदवला.



