भोळे महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न!

 भुसावळ - येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर आज राजोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संपन्न झाले. 
शिबिराच्या सात दिवसांच्या कालावधी मध्ये शिबिरार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी नी स्मशानभूमी परिसरात स्वच्छता केली तसेच स्मशानभूमी परिसरातील झाडांचे ट्री गार्ड काढून झाडांचे आळे खोल करून तरी गार्ड पुन्हा बसवले. ग्रामस्वच्छतेसह शाळा  परिसरात शोषखड्यांची निर्मिती केली गावातील कचरा उचलून टाकत मुख्य रस्त्यावरील मती आणि वाळू चे ढिगारे काढून टाकले.  तसेच वड, पिंपळ वृक्षांचे वृक्षारोपण करून पंचक्रोशीत एकमेव असलेल्या बुचा च्या झाडाचे पूनररुजीवन केले.
 शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे प्रसंगी प्रास्ताविक आणि साप्ताहिक शिबिराचा अहवाल प्रा डॉ दयाघन राणे यांनी सादर केला. त्या नंतर वैभव पाटील, सर्वेश पवार आकाश मानकर,धनश्री वाणी आणि मीनाक्षी आमोदकर या शिबिरार्थी विद्यार्थ्यानी तसेच माजी स्वयंसेवक आणि शिबिराचे स्थानिक समन्वयक श्री मयूर महाजन यांनी भावपूर्ण मनोगते सादर केलीत. कार्यक्रम प्रसंगी मा. सरपंच सौ पुष्पाताई गिरधर पाटील, उपसरपंच दिनेश सीताराम पाटील, ग्राम विस्तार अधिकारी प्रवीण चौधरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षिका सौ. संध्या सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून तर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. 
 शिबिरात मिळालेल्या स्वावलंबनाच्या संस्काराचा उपयोग दैनंदिन जीवनात सतत उपयोग करत आई वडील तसेच  वडीलधाऱ्या व्यक्तींची सेवा करावी असे मत प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी आपल्या अध्यक्षीय समारोप समारंभ प्रसंगी व्यक्त केलेत. तर ग्राम पंचायत चे सरपंच पुष्पाताई पाटील यांनी शिबिरार्थ्यानी विद्यार्थ्याना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देवून विद्यार्थ्यानी श्रमदानाच्या माध्यमातून केलेल्या कामा बद्दल समाधान करून त्यांचे कौतुक केले. या प्रसंगी ग्रामपंचायत प्रशासन तर्फे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ जी पी वाघुळदे, महिला अधिकारी प्रा निर्मला वानखेडे व सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ दयाघन राणे यांचा शॉल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राशिक तायडे या विद्यार्थ्याने तर आभार प्रदर्शन यश अनिल चौधरी या विद्यार्थ्याने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकाऱ्यांसह प्रकाश चौधरी या शिक्षकेतर कर्मचाऱ्याने संपूर्ण वेळ निवासी राहून शिबिरातील विद्यार्थ्यांना सहकार्य केले.  शिबिर कालावधी मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा डॉ सचिन नांद्रे, विद्यापीठ सेनेट सदस्य प्रा इ. जी. नेहेते, भोळे महाविद्यालयामधील प्रा संजय देविदास चौधरी, प्रा एस.एस. पाटील, आणि प्रा. ए. जी. नेमाडे  यांनी शिबिराला सदिच्छा भेट दिली  शिबीर यशस्वीपणे  संपन्न झाल्याबद्दल कार्यक्रम अधिकाऱ्यानी राजोरे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रॅम पंचायत प्रशासन, ग्रॅम विस्तार अधिकारी, पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक माझी विद्यार्थी श्री मयूर महाजन यांचे आभार व्यक्त केलेत.