आजच्या बदलत्या परिस्थितीत स्त्रीयांनी स्वयं निर्भर व्हावे – सौ रागीणी पुराणिक


भुसावळ – आधुनिक काळात स्त्रियांचे स्थान आर्थिक, सामाजिक , राजकीय क्षेत्रात पूर्णपणे बदलले दिसते यासाठी आजच्या बदलत्या परिस्थितीत स्त्रीयांनी स्वयं निर्भर बनले पाहिजे धीट बनले पाहिजे असा मौलिक महत्वपूर्ण सल्ला जेष्ठ शिक्षिका सौ रागीनी पुराणिक यांनी महिलांना दिला .
रोटरी क्लब ऑफ भुसावळ तर्फे चक्रधर नगर भागातील रोटरी भवन येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान व कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला .
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षिका सौ. रागिणी पुराणिक मॅडम , तसेच प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे , राजेंद्रकुमार फेगडे
प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ भुसावळ , सक्षम कॉन्सलिंगच्या अध्यक्षा तथा प्रोजेक्ट चेअरमन रो सौ आरती चौधरीं , माजी प्रेजिडेंट रो गजानन ठाकुर (मामाजी ) , रो प्रोजेक्ट इंचार्ज ,प्रदिप दवे सर ,रो सचिव राजेन्द्र पाटिल उपस्थित होते .
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व गणेश पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली .
यावेळी मार्गदर्शन करतांना सौ पुराणिक म्हणाल्या की कष्टकरी महिला जबाबदारी सांभाळून कार्य करतात . स्त्री घराचा आधारस्तंभ असते .घरातील नाती जपत असते . याकरीता आजच्या महिलांना समन्वय व सन्माना सोबत कौतुकाची थाप हवी असते. यावेळी पौराणिक काळातपासून ते इतिहासात महिलांचा असलेला आदर व सन्मान याबद्दल सोदाहरण देवून महत्वपूर्ण माहिती दिली . तसेच भारतात व महाराष्ट्रात विविध क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा अड़चनीवर मात करून आपल्या कार्याचा ठसा उमटवीणाऱ्या सर्व पहिल्यां महिलाची थोडक्यात माहिती देवून महिलांचे स्थान अटळ व अढळ असल्याचे सांगीतले .
तर सौ रजनी सावकारे यांनी
एक स्त्री विविध रूप घेवून वावरते
महिला शक्ती त्यांचे कर्तृत्व यांना सलाम करून महिलांना परीवाराची साथ मिळाली तर ती खुप काही करु शकते
एकत्र कुटुंब पद्धती संकल्पना कुठेतरी पुन्हा अमलात आली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. मुलांवर संस्कार , शरीरीक प्रगती , धार्मिक , वैचारिक दृष्टया एकत्र कुटुंबात योग्य प्रकारे होण्यास मदत मिळते . शेयरिंग आणि केयरिंग ही भावना असलीच पाहिजे ,
बदल सुरुवात आपल्यापासून झाला पाहिजे , स्त्री कर्तुत्व घडवते समाजात महिलांवरील अन्याय व अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे याकरीता प्रत्येकाने स्त्रियांचा आदर कसा करावा असे शिकवले तर सामजात अविचार वाढनार नाही असे आवाहन केले .
यांच्या कार्याचा झाला गौरव
महिला वायरमन भागयश्री बडगुजर , महिला स्वच्छता कर्मचारी सुलोचना विजय पथरोड , चहाचा व्यवसाय आशा गजानन कलापुरे,महिला पत्रकार
उज्वला बागुल , रेल्वे चालक लोकोवायलर प्रियंका टेकाडे ,
रेल्वे गार्ड सरिता माने , वाहतुक पोलिस , विजया सपकाळे , घरकाम हिराबाई पाटील , पोलीस कर्मचारी आशा तडवी , पेट्रोलपंप कर्मचारी अवंतिका नेहते , निवासी तहसिलदार (संगांयो) शोभा घुले , प्रिटिंग कर्मचारी कुंदा अनिल ब-हाटे , आरोग्य सेविका मनिषा ठाकुर ,अंगणवाडी सेविका
सुगंधा इंगळे , शिक्षिका
ज्योती नंदलाल बेलसरे ,
रिक्षा चालक रंजना सपकाळे,
घरकाम लक्ष्मी खरे , भूविचार निलिमा जंगले
सत्कारार्थी यांना मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र , स्मृतिचिन्ह , गुलाबपुष्प देवून गौरविन्यात आले .
कार्यक्रमांचे सूत्रसंचलन सौ जयश्री दवे ,प्रास्ताविक राजेंद्र फेगडे, तर आभार रो हेमंत नाईक यांनी मानले .