ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये विद्यार्थ्याना लस.


भुसावळ -ताप्ती पब्लिक स्कुल सीबीएसई इग्लीश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना रोग प्रतीकार शक्तीच्या व्हॅक्सीन नुकत्याच देण्यात आले,इयत्ता दहावीची परीक्षा काही दिवसात सुरू होणार असून त्या परीक्षेच्या काळात सर्व विद्यार्थ्यांचां कोरोना सारख्या विषाणू पासुन बचाव व्हावा म्हणून साधारण अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनींना लस देण्यात आली.
यावेळी भुसावळ नगरपालिका डॉक्टरांची टीम डॉक्टर आतीया खान,माधुरी चव्हाण,रेखा जाधव, प्रशांत कुलकर्णी,स्वाती रावते व त्यांच्या सहकाऱ्यांसह ताप्ती पब्लिक स्कूलच्या शिक्षीका पॅट्रेशिया हॅसेट,अनिता येवले,रितू प्रभुदेसाई,श्रद्धाली घुले,प्रतिभा काकडे व नॉन टिचींगचे शिरीष झांबरे,पुष्कर वायकोळे,मनोज फेगडे,रोहिणी पाटील,चेतन चौधरी यांनी परिश्रम घेतले.दहावी सीबीएसई च्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी हया व्हॅक्सीन देण्यात आल्या असल्याचे शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांनी सांगितले.