डीआयजी शेखर पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल बाजारपेठचे पोलिस कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानित :

भुसावळ शहरात बस स्टँड जवळ येथे प्रदेशातुन एक इसम गावठी बंदूक विक्री करण्यासाठी आल्याची गोपनीय माहिती पोकाँ प्रशांत परदेशी यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे बस स्टँड परिसरात सापळा रचून प्रदेशातील एक इसम पिशवी घेऊन संशयीत रित्या फिरत असतांना मिळून आला होता. या आरोपिताकडून चार गावठी बंदूक व दिपनगर निंबोरा येथे एक गावठी बंदूक विक्री केल्याची कबुली दिल्यावरून आरोपीस ताब्यात घेऊन एक गावठी बंदूक हस्तगत केली होती. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला आर्म अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरची कामगिरी पोकॉ प्रशांत परदेशी, पोना निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, सपोनि हरीष भोये अशांनी मिळून केली होती. या कामगिरीची बद्दल पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी वरिष्ठांना माहिती सुपूर्त केल्याने यांची दखल नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. जी. बी. शेखर पाटील यांनी घेतली असून

भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी दरम्यान बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचारी व अधिकारी यांना जळगांव पोलीस अधीक्षक कार्यालयात शुक्रवार रोजी उकृष्ठ कामगिरी केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.