भुसावळ – मद्य सेवन करून शिवीगाळ केल्याने राग येवून एका तरुणावर कोयता हल्ला करून जखमी केल्याची घटना येथील आठवडे बाजार भागातील डिस्को टॉवर जवळ घडली . ११ शुक्रवार रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शहरातील आठवडे बाजार भागातील डिस्को टॉवर जवळ सैय्यद शाहरुख वय २५ रा.पंचशील नगर या तरुणाच्या डोक्यात एका इसमाने मद्य सेवन करून शिवीगाळ करीत डोक्यात व नाकावर वार करून जखमी केल्याची घटना रात्री ९ वाजेच्या सुमारास येथे घडली. प्राप्त प्राथमिक माहिती नुसार जखमीं यास ट्रामा केअर सेंटर येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे .



