आयजी यांच्या हस्ते चोरी गेलेला मौल्यवान ऐवज तक्रारदारांना परत : तक्रारदारांनी मानले पोलिस प्रशासनाचे आभार :


भुसावळ : चोर्‍या, घरफोड्या होवून तपास लागत नसल्याची एरव्ही सर्वसामान्यांची ओरड असलीतरी चोर्‍या, घरफोड्यांसह अप्रिय घटनेनंतर मुद्देमालाची चोरी होवून आरोपी गजाआड झाल्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमालाची रीकव्हरी होते व न्यायालयाच्या आदेशानंतर हा मुद्देमाल तक्रारदाराला परत केला जातो.
भुसावळात पोलिसांनी काही वर्षांपूर्वी झालेल्या चो-या मधील चोरीस गेलेला माल तपास करून न्यायालयीन पूर्तता करून तक्रारदारांना बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या वार्षिक परीक्षणासाठी आलेल्या आयजी डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते परत केला .
बुधवार ९ रोजी पोलिस उपअधीक्षक कार्यालयात सात तक्रारदार विशाखा गौतम, मीनाक्षी चौधरी, रमेश सपकाळे, किशोर शाक्यमुनी, गिरीश मुनेश्वर, विनोद ढाके, धीरज उंबरकर या
तक्रारदारांना पाच मोबाईल, टॅबसह सोन्याचा ऐवज असलेला मुद्देमाल परत करण्यात आला.
यावेळी चोरी गेलेला मोबाईलसह टॅब व सोन्याचा ऐवज अनेक वर्षानंतर परत मिळाल्याने त्यांना अचानक मोठा आनंद झाला .
तक्रारदार विशाखा गौतम, मीनाक्षी चौधरी, रमेश सपकाळे, किशोर शाक्यमुनी, गिरीश मुनेश्वर, विनोद ढाके, धीरज उंबरकर यांना चोरी गेलेला मोबाईलस टॅब व सोन्याचा ऐवज अनेक वर्षानंतर परत मिळाल्याने त्यांना आनंद झाला व त्यांनी पोलिसांची कामगिरी स्तुत्य व चोख असून त्यांचे कौतुक केले .
या उपक्रमासाठी एपीआय रुपाली चव्हाण (वाचक), एपीआय प्रकाश वानखेडे, हवालदार नंदकिशोर सोनवणे, हवालदार संदीप चव्हाण, श्रीकांत ठाकूर, शालिनी वलके, अश्विनी जोगी आदींनी परीश्रम घेतले.