भुसावळ – येथील कला, विज्ञान आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ च्या शिस्त समिती, भूगोलशास्त्र मंडळ आणि WELSPUN ग्रुप (CSR) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बुधवार दिनांक 2 मार्च, 2022 “प्रथमोपचार आणि रोड सेफ्टी” चे मोफत एक दिवसीय प्रशिक्षण भूगोल विभागात संपन्न झाले.

सदर प्रशिक्षणास मंचावर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. एम. व्ही. वायकोळे WELSPUN ग्रुप च्या आम्रपाली गोंदाने, रेड क्रॉस सोसायटी चे श्री. जी. टी. महाजन, श्री. डी. टी. महाजन, श्रीमती. उज्वला वर्मा हे उपस्थित होते.
कार्यशाळेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना दुर्मिळ अशी संधी प्राप्त झालेली आहे. समाज हितासाठी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले.
WELSPUN ग्रुप च्या नाम्रपाली गोंदाने, यांनी त्यांच्या कंपनी द्वारे परीसरात चालवल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पाविषयी माहिती दिली. रोडवर अपघात झाला असता कशी कार्यवाही करावी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडियाचे श्री. जी. टी. महाजन यांनी विविध प्रकारच्या अपघातांमध्ये कुणाला संपर्क साधावा ? अशा अत्यावश्यक नंबरांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अपघात झालेल्या अवस्थेत प्रथमोपचार कशा पद्धतीने करावे आणि त्यासाठी स्वतःची मानसिकता कशी ठेवावी याचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
श्री. डी. टी. महाजन यांनी भौगोलिक परिस्थिती आणि ऋतुमानानुसार अपघातांचं प्रमाण आणि ठिकाण कसं बदलत जातं याचे विस्तृत विवेचन केले. प्रथमोपचार मिळाल्यास आपल्याला अनेक जीव वाचवता येतील असे देखील त्यांनी सांगितले. श्रीमती उज्वला वर्मा यांनी विद्यार्थ्यांसमोर विविध प्रात्यक्षिके सादर केली.
वरील कार्यशाळेस भूगोल विभाग प्रमुख प्रा. व्ही. पी. लढे, शिस्त समितीचे सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिस्त समिती प्रमुख प्रा. अनिल हिवाळे, सूत्रसंचालन प्रा. विलास साळुंखे, परिचय प्रा. संगीता भिरुड आणि आभार प्रदर्शन प्रा. दीपक पाटील यांनी केले.


