नाहाटा महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास व राष्ट्रीय तंबाखू विरोधी कार्यक्रम उत्साहात .


भुसावळ – -सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाद्वारे आपल्या विचारांना नवीन बळ द्यावे . तसेच व्यसनांच्या आधीन न जाता आपले व्यक्तिमत्व कसे खुलवता येईल . याकडे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ एम व्ही वायकोळे यांनी केले. येथील भुसावळ कला, विज्ञान आणि नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल समितीद्वारे आयोजित ‘आनंद व आनंदी शेवट ‘ तसेच ‘राष्ट्रीय तंबाखू विरोधी कार्यक्रमावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या .
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ एम व्ही वायकोळे, बालरोग तज्ञ डॉ रेखा पाटील डॉ पी ए अहिरे डॉ रश्मी शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते . यावेळी प्राचार्य डॉ एम व्ही वायकोळे म्हणाल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गरजा लक्षात घेऊन आपला व्यक्तिमत्त्वाचा विकास करून इतर तत्सम व्यसनापासून दूर राहुन नवसमाज निर्माण करावा . तसेच महाविद्यालयात होणाऱ्या विविध कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास घडवून आणावा .
बालरोग तज्ञ डॉ .रेखा पाटील म्हणाल्या -व्यक्तिमत्व विकास व संवाद या माध्यमातून विविध दाखले देत आजची तरुण पिढी इंटरनेट, मोबाईल यातच गुरफटलेली आहे यातून बाहेर येऊन त्यांनी आपला स्वतःचा विकास घडवावा तसेच महाविद्यालयीन जीवन आनंदाने जगावे जीवन जगत असताना सामाजिक भान जपत इतरांना आनंद कसा देता येईल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ पी ए अहिरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा डॉ प्रफुल्ल इंगोले, प्रा . विकास साळुंखे यांनी केली प्रमुख पाहुण्यांचा परिचय विद्यार्थिनी गायत्री बजाज हिने करून दिला . राष्ट्रीय तंबाखु विरोधी पथकातील डॉ नितीन भारती डॉ. निशा कटरे सहाय्यक राहुल बहाटे या पथकाने तंबाखु व्यसनांमुळे होणारे दुष्परिणाम या विषयी माहिती दिली . उपप्राचार्य डॉ .एस बी पाटील, उपप्राचार्य डॉ बी एच बहाटे, उपप्राचार्य डॉ ए डी गोस्वामी उपप्राचार्य डॉ एन ई भंगाळे यांचे मार्गदर्शन लाभले . प्रा . किरण वारके, प्रा कल्याणसिंग पाटील डॉ मनोज पाटील डॉ राजेंद्र तायडे डॉ ललित तायडे प्रा आकाश तायडे प्रा ममताबेन पाटील प्रा सपना कोल्हे प्रा स्वाती शेळके प्रा जयश्री चौधरी यासह प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते