दीपनगर येथील श्री शारदा माध्यमिक विद्यालयात अडव्होकेट सौ रोहिणी खेवलकर (खडसे) यांचा तसेच विज्ञान ड्रामा कॉम्पिटिशन मध्ये सिल्व्हर आणि ब्रांझ मेडल मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला
भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील शारदा विद्यालयात जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अँड रोहिणी खेवलकर (खडसे) श्री शारदा शिक्षण मंडळ तर्फे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेचे अध्यक्ष रमेश निवृत्ती गाजरे त्यांच्या हस्ते सौ रोहिणी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभामध्ये मार्गदर्शन करताना अँड रोहिणी शैक्षणिक संस्थांच्या अनेक समस्यांचा उल्लेख केला व त्याचे सोडवणूक करायची असेल तर जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांनी एकजूट होऊन लढा दिला पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस.जी.चौधरी संचालक मिलींद गाजरे, राकेश राणे,शाळेचे मुख्याध्यापक जी.डी चौधरी सर , पर्यवेक्षक श्री जे.बी पाटील सर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते
तसेच श्री शारदा माध्यमिक विद्यालय, दिपनगर या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्टच्या हर घर बाल कलाम कार्यक्रमांतर्गत ISTF-2022 ( Virtual ) Indian Science Techno Festival द्वारा काही कार्यक्रम घेण्यात आले त्यापैकी,एक कार्यक्रम सायन्स ड्रामा कॉम्पिटिशन 2022 हा होता त्या स्पर्धेची मुख्य थीम- भारतीय स्वतंत्र चळवळ आणि विज्ञानाची भूमिका ही होती.
सायन्स ड्रामा स्पर्धा ही एक अशी स्पर्धा आहे जी सहभागींना वैज्ञानिकतेची सांगड घालून देते. नाट्यमय स्वभावासह ज्ञान. संपूर्ण भारतातील शाळांमधील संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा आहे.
विश्वास आहे की, सहभागींची प्रतिभा प्रदर्शित करण्याची आणि स्पर्धा करण्याची ही एक उत्तम संधी मिळाली. यामध्ये श्री शारदा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता ,यांनी चार ड्रामा सादर केले. चार ही ड्रामा यांच Top-10 लिस्ट मध्ये Selection झाले आणि फाइनल ला त्यातील 3 टीम ने सिल्व्हर मेडल घेऊन विजेत्या झाल्या तर एका टीम ने ब्रांझ मेडलने विजयी झाली. या सर्व कार्यक्रमा साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरित करण्यासाठी विद्यालयातील शिक्षिका श्रीमती नीलिमा पाटील , सौ रुपाली राणे , श्रीमती रेखा चौधरी , मनीषा पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
तदनंतर विद्यालयात संस्थाचालक संघटनेच्या कार्याध्यक्षाअँड. सौ रोहिणी खेवलकर (खडसे) यांनी विद्यालयात येऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सत्कार करून त्यांना पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन केले . तसेच दिनांक 27 फेब्रुवारी रोजी नॅशनल लेव्हलच्या झूम मीटिंगमध्ये वैज्ञानिक चंद्रमोळी जोशी* व बी.के.त्यागी यांनी विद्यार्थ्यांना सिल्व्हर आणि ब्रांझ मेडल देऊन सत्कार केला आणि त्यांच्यात असलेल्या गुणांचा गौरव करत भविष्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या सुप्त गुणांना वाव द्यायला पाहिजे अशा प्रकारचे मार्गदर्शन केले आणि असाच प्लॅटफॉर्म तुम्हाला भविष्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल उपलब्ध करून देण्यात येईल असे वैज्ञानिकांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या वेळी वेगवेगळ्या राज्यांमधील मधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.



