भुसावळात दहा अन्डरॉईड मोबाइलसह चोरटे पोलिसांच्या ताब्यात ;


भुसावळ – भुसावळ शहरातील बस स्टॅण्ड परिसरात डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांचे पुतळ्याजवळ गस्त करीत असताना दोघा मोबाइल चोराना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचे जवळ 10 अन्डरॉईड मोबाइल फोन आढळून आले.
दिनांक 19/02/2022 रोजी सायंकाळी पो.हवा. रमन सुरकर पोना निलेश चौधरी पोना उमाकांत
पाटील.पो.कॉ प्रशांत रमेश परदेशी.पो.का.योगेश माळी,पो.का.प्रशांत सोनार असे भुसावळ शहरातील बस स्टॅण्ड
परिसरात डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांचे पुतळ्याजवळ गस्त करीत असताना शेख रहीमोद्दीन शेख कमरोद्दीन वय
रा. रजा टॉवर जवळ पापा नगर भुसावळ व शायबाज खान रमजान खान वय 21 रा. फैजपुर ता.यावल असे पोलीसांना
पाहुन पळुन जात असल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्याची अगझडती घेतली . त्याच्या ताब्यात 10 अन्डरॉईड मोबाईल
फोन मिळुन आल्याने त्याबाबत त्यांना विचारपुस केली असता तो उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने व त्याच्याजवळ असलेले मोबाईल फोन बाबत कोणत्याही प्रकारे कागदपत्र नसल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन 77,000/-रुपये किमतीचे 10
अन्डरॉईड वेगवेगळे कंपनीचे मोबाईल फोन असे जप्त करुन वरील आरोपी विरूद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस
स्टेशनला महा.पो.का.कलम 124 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंदक्रांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक हरीष भोये, एएसआय शरीफ काझी, हवालदार रमण सुरळकर, नाईक निलेश चौधरी, नाईक उमाकांत पाटील, शिपाई प्रशांत परदेशी, शिपाई योगेश माळी, शिपाई प्रशांत सोनार, शिपाई दिनेश कापडणे, कॉन्स्टेबल योगेश महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.