वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात वीज ग्राहकांचा संताप : महाराष्ट्र वीज ग्राहक हक्क संघटनेच्या वतीने महावितरण अधिकाऱ्यांना दिले निवेदन :२३ फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन :


भुसावळ – वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात वीज ग्राहकां चा संताप होत असून येेेके ततमहाराष्ट्र वीज ग्राहक हक्क संघटनेच्या वतीने महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन दिले . दरम्यान महाराष्ट्र वीज ग्राहक हक्क संघटनेची बुधवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वा. महत्वाची बैठक श्रीनगर येथे आयोजित करण्यात आली असून परिसरातील ग्राहकांनी वीज देयकांच्या तक्रारी असल्यास संपर्क साधावा असे आवाहन प्रा. धीरज पाटील, विशाल ठोके, मिलिंद उंबरकर, अमोल पाटील, सुरज चौधरी, देवेश सपकाळे यांनी केले आहे.

वीज ग्राहकांना अतिरिक्त विज देयके दिली गेली. बिल भरले नाही या कारणास्तव विजेचे मीटर काढून नेण्याच्या वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. भुसावळ विभागातील वीज ग्राहक वीज वितरण कंपनी विरोधात संतप्त झाले असून, गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून अयोध्या नगर, मोहित नगर, श्रीनगर, भोईवी नगर, गणेश कॉलनी, गोदावरी नगर, अष्टविनायक कॉलनी, खळवाडी परिसरातील ग्राहकांना चुकीची देयके देण्यात येत आहे. वारंवार सूचना केल्यावरही महावितरणने देयके दुरुस्त केलेली नाही. अशोक गिरधर नारखेडे (117755013107), वैशाली प्रकाश खडसे (117754094286), हेमराज ज्ञानदेव खडसे (117750044616), सुमनबाई भागवत उंबरकर (117756009898), गोकुळ गंगाराम लोखंडे (117750315849), बी एस. वाणी (117750010193), विठठल तुकडू कोळी (117750247088), जे डी मिस्त्री (117750180226), विजय सूर्यभान पाटील (117755011163), एन एन भंगाळे (117750016701), संजय एकनाथ पाथरवट (117755005791) देवेश अशोक सपकाळे (117754087522) या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र वीज ग्राहक हक्क संघटनेच्या वतीने महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

दोन दिवसात दुरुस्ती करा:
देयके दुरुस्त केल्याशिवाय भरणा करण्याचा आग्रह करू नये. परिसरातील ग्राहकांना देण्यात आलेल्या अवाजवी देयकांची दोन दिवसात दुरुस्ती करा अश्या सूचना प्रा.धिरज पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.