साकळी – प्रतिवर्षाप्रमाणे माघ वद्य सप्तमी रोजी श्री सच्चिदानंद स्वरूप बहुउद्देशीय संस्था संचलित श्री गजानन महाराज फाउंडेशनच्या वतीने अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री.गजानन महाराजांचा ” १४४ वा प्रकटदिन उत्सव व श्रींच्या मंदिराचा ‘अकरावा वर्धापनदिन सोहळा’ दि. २३ फेब्रुवारी २०२२, बुधवार रोजी साजरा करण्यात येत आहे .
या निमित्ताने जोशी फार्म, मनवेल रोड,साकळी, ता.यावल येथे महाप्रसाद व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात दिनांक २२ व २३ रोजी सकाळी ७ ते ३ वाजे दरम्यान मारोडे, काटी ता. नांदूरा जि. बुलडाणा येथील वक्ते श्री. हभप गजानन महाराज हे ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे सामुहिक पारायण करतील . तर जितेंद्र नेवे (छोटू बाबा), गादीपती हजरत रशिदबाबा आश्रम, साकळी यांचे हस्ते सकाळी- ११.३० वाजता
महाआरती होईल व महाप्रसादाचे सकाळी-१२ ते २.३० पर्यंत आयोजन केले आहे.
भाविकानी दर्शनाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे भुसावळ येथील दिव्य मराठीचे ब्युरोचीफ हेमंत जोशी, साकळीचे श्री गजानन महाराज फाउंडेशन अध्यक्ष अनिल जोशी, श्री गजानन महाराज फाउंडेशन, यावल संचालक अनंत जोशी, व जोशी परिवार, साकळी, ता.यावल यांनी केले आहे .



