भुसावळ -तापी एज्युकेशन सोसायटी संचलित भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी, प्रमुख वक्ते प्रा.श्रीपाद वाणी (इतिहास विभाग), रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र नाडेकर, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.ममताबेन पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास महिरे उपस्थित होते. जयंतीनिमित्त माता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
प्रमुख वक्ते प्रा.श्रीपाद वाणी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जन्मापासून स्पष्ट करत, हिंदवी स्वराज्याच्या अखिल भारतातील स्थापने पर्यंत विद्यार्थ्यांसमोर मांडला. विविध संदर्भ व इतिहासाचे दाखले देत आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.आर. एस. नाडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नेहा पाटील व कु. वैष्णवी बावस्कर यांनी पार पाडले. कार्यक्रमात स्फूर्ती आणण्यासाठी, कुु रौशनी जाधव व कु. वैभव बोदोडे यांनी गीत गायन केले.
अध्यक्षीय मनोगत उपप्राचार्य प्रा. डॉ ए.डी. गोस्वामी सर यांनी केले.
कार्यक्रमाला कु. कल्याणी पराडे, आंकाक्षा चांदेकर, सागर सोनवणे, जयश्री पाटील, हर्षल चव्हाण, आकाश बाविस्कर, खुशाल मानकर, तारकेश्वरी सोनवणे, स्वप्निल डोळसे,कांचन पाटील, हेमलता, वैभव बोदोडे, चेतना पाटील, आदित्य तायडे प्रविण नाना पाटील, गायत्री बजाज व संजना दोधानी इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ.ममताबेन पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ.एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य बी. एच. बऱ्हाटे, व डॉ. एन. इ. भंगाळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.



