शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांची ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे शैक्षणिक भेट :

भुसावळ – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद व अलुमिनि एसोसिएशन
(माजी विद्यार्थी संघटना) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शैक्षणिक भेट ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे पार पडली
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध अनुभागांमध्ये जाऊन फॅक्टरी उत्पादन प्रक्रिया मशीन व कार्यपद्धती यांची माहिती घेतली
ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ ही शस्त्रे आणि दारूगोळा बनविनाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टर्रीना पॅकेजिंग बॉक्सेस उपलब्ध करून देते
तसेच रॉकेट लॉन्चर पिनाका पॉड चे देखील उत्पादन येथे केले जाते
भारतीय सैनिकांसाठी
आर्मी नेव्ही ला लागणारे शस्त्रे आणि दारूगोळा पॅकेजिंगचे वेगवेगळे बॉक्सेस व सिलेंडर येथे बनविले जातात
ऑर्डननस फॅक्टरी भुसावळ मध्ये शीट मेटल वर्क प्रामुख्याने केले जाते
फॅक्टरी पाहनी झाल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत मिटींगचे आयोजन केले होते मीटिंगमध्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन व महाविद्यालयातील रोबोकॉन व टेकसेवर्स व बहा. अशा विविध तांत्रिक उपक्रमांबाबत सादरीकरण केले सदरील बैठकीत येणाऱ्या काळात महाविद्यालय व ऑडनस फॅक्टरी भुसावळ यांच्या दरम्यान तांत्रिक भागीदारी करण्याबाबत चर्चा झाली बैठकीत महाप्रबंधक
वसंत निमजे यांनी विद्यार्थी करीत असलेल्या उत्कृष्ट कामांची प्रशंशा केली आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले व त्यांच्या विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा दिला अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता महाप्रबंधक यांना औरंगाबाद येथे येण्याची विनंती महाविद्यालया तर्फे करण्यात आली शासकीय अनुमती घेऊन येन्या याबाबत सहमती दर्शवली
सदर भेट यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राध्यापक वासनकर सर यांनी ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ चे आभार व्यक्त केले
सदरील भेटीस महाविद्यालयातर्फे प्राध्यापक के एस वासनकर व बारा विद्यार्थ्यांचे प्रतिनिधि मंडळ
अलुमिनी असोसिएशन तर्फे वेदांत देशमुख व मनोहर कुलकर्णी उपस्थित होते
सदर भेट यशस्वी करण्याकरिता ऑडनस फॅक्टरी भुसावळ तर्फे संदीप मसाळ डीजीएम. सुभाष पाटील व एस तोडकर व
एम एस राऊत इत्यादींनी मोलाचे योगदान दिले अशी माहिती ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे
(पीआरओ) बी.देविचंद
(डीजीएम) यांनी दिली