वरणगांव -भारतीय जनता पार्टी वरणगाव शहरा तर्फे आज बस स्टॅन्ड चौक वरणगाव येथे महाविकासआघाडी ने घेतलेल्या किराणा दुकानावर वाईन चा निर्णय निषेधार्थ तसेच शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे ते कापू नये जळालेले डीप्या त्वरित बसवण्यात यावे यावल येथे आदिवासी कोळी महिलेवर जो अत्याचार झालाय त्या दोषींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच वरणगाव शहर व परिसरातील अवैध धंदे बंद करा तसेच वरनगाव नगर परिषदेच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेच्या कामाला जलदगतीने सुरुवात करा तसेच शहरात भूमिगत गटारी चा प्रस्ताव मंजूर करा यासह तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराचे काम भोगावती नदी चे काम गार्डन चे काम त्वरित सुरू करा
यासह इतर मागण्यांसाठी आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने महा विकास आघाडी चा निषेध केला हे सरकार महाविकास नसून मध्य विकास आघाडी आहे असा आरोप माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केला महा विकास आघाडीने वाईन किराणा दुकान वर विकण्याचा जो निर्णय घेतला आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नये डीप्या जळालेला डीप्या त्वरित बसवण्यात यावे तसेच आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचारात गुन्हेगारांना त्वरित शासन व्हावे नगरपरिषदेची प्रलंबित कामे त्वरित सुरू करण्यात यावी या मागण्यांची राज्य सरकारने दखल न घेतल्यास जनतेला रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात जनआंदोलनअधिक तीव्र छेडणार असाच असा इशारा यावेेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला यावेळी महा विकास आघाडी चा अधिकार असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता आंदोलनात मध्ये माजी नगराध्यक्ष सुनील काळे उपनगराध्यक्ष शेख आखलाक शेख युसुफ जिल्हा उपाध्यक्ष ऍड ए जी जंजाळे भाजपचे शहराध्यक्ष सुनील माळी मिलिंद भैसे डॉ सादिक साबिर कुरेशी महिला आघाडी अध्यक्षा सौ प्रणिता चौधरी पाटील सौ रुख्मिनी काळे मंदाताई थटार कस्तुराबाई इंगळे भाजयुमोचे तालुकाउपाध्यक्ष किरण वंजारी शहराध्यक्ष आकाश निमकर पप्पू ठाकरे हितेश चौधरी गोलू राणे नटराज चौधरी अनिल वंजारी रमेश पालवे डॉ प्रविण चांदणे नाना चौधरी योगेश माळी माजी सरपंच सुभाष धनगर कृष्णा माळी संदीप माळी इरफान पिंजारी रॉक्स कश्यप गजानन वंजारी जीवराम पाटील वसीम शेख शोयब शेख निजाम शेख महेश माळी सुला झोपे मुस्लिम अन्सारी जैस्वाल बापूजी दादू पालवे गंभीर माळी रमेश बैरागी शाहरुख शेख आवेस शेख बळीराम सोनवणे के के आंभोरे बाळा धनगर इ सह अनेक कार्यकर्ते हजर होते .




