एम आय तेली स्कुलमध्ये सावित्रीबाई जयंती उत्साहात साजरी :


भुसावळ – येथील खडका रोडवरील एम आय तेली इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये नुकतीच सावित्रीबाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
प्रारंभी मुख्याध्यापक वाजिद सर यांचे हस्ते सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार , तीच सावित्री आज जगाची शिलेदार, यासह शिक्षणाची महाद्वारे आणि प्रगती या विषयावर विद्यार्थ्याना अमूल्य मार्गदर्शन मुख्याध्यापक वाजिद सर यांनी अमूल्य मार्गदर्शन केले .तसेच इयत्ता 5 वी मधील विद्यार्थिनी सैयद अश्मीरा हिने सावित्रीबाई यांची वेशभूषा धारण करून त्यांचे कार्य व महती विषद करीत सादरीकरण केले . तर 10 विची विद्यार्थिनी शाह कश्यप हिने जीवनकार्यावर विस्तृतरित्या माहीती प्रकाशझोत टाकला . सूत्रसंचालन चंद्रशेखर भारंबे सर यांनी केले तर आभार इमरान सर यांनी मानले .
दरम्यान यानिमित्त आयोजित मेहंदी स्पर्धेत विजेत्या विद्यार्थिनी यांना महिला शक्ती समाजसेवा महिला मंडळाच्यावतीने संस्था अध्यक्षा अंजुम खान यांनी बक्षीसे देवून सन्मानित केले .