भुसावळ :- येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गाँधी यांची पुण्यतिथि म्हणजे हुतात्मा दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मानसी कुलकर्णी उपस्थित होत्या… या वेळी विचार व्यक्त करताना शाळेचे पर्यवेक्षक श्री संजीव पाटील सर यांनी सर्वानी आपल्या जीवनात महात्मा गाँधीजी च्या विचाराचा स्वीकार करा असे सांगितले..
कार्यक्रमा प्रसंगी महात्मा गाँधीजीचे आवडते भजन वैष्णव जन ते… सादर करण्यात आले… कार्यक्रमां नंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मिळून विद्यालय परिसराची स्वछता केली.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सोनाली वासकर यांनी केले…



