भुसावळ : आगामी नगरपालिका व जिल्हा परीषद तसेच पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी शहरातील शासकीय विश्रामगृहात रविवार, 30 रोजी दुपारी एक वाजता वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक होत आहे. जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे हे बैठकीत मार्गदर्शन करतील. जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी वंदना सोनवणे, जिल्हा संघटक अरुण तायडे, महिला आघत्तडी जिल्हा महासचिव वंदना आराक, कामगार चिटणीस बालाजी पठाडे आदींची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीत बुथ बांधणी अहवाल, पक्ष बांधणी तसेच सक्रिय सहभाग न घेणार्या पदाधिकार्यांबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, महिला आघाडी, कामगार आघाडी तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन जिल्हा सचिव दीपक मेघे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा प्रवक्ता अॅड.विनोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सुरडकर, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, जिल्हाप्रमुख सचिन बार्हे आदींनी केले आहे.


