भुसावळ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत व्यापाऱ्यांकडून लाखो रुपये न घेता नियमाने दुकाने दिली व कोणताही गैरव्यवहार याठिकाणी झाला नसल्याचा खुलासा आज अडत व्यापाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला

पत्रकार परिषदेत यावेळी भाजीपाला अडत असोसिएशन अध्यक्ष नरेंद्र चौधरी, उपाध्यक्ष उमेश चौधरी, सचिव निलेश माळी, बबलू बागवान, रईस बागवान, विजय लोकवाणी, योगेश चौधरी, प्रविन चौधरी, दीपक काटकर, विजय मराठे, नरेश जाधव आदी उपस्थित होते. भाजीपाला अडत संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र चौधरी यांनी सांगितले की सभापती सचिन चौधरी यांच्यावर जे शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप केले जात आहे यात कुठलेही तथ्य नाही बाजार समितीत कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे बाजार लिलाव बंद होता मात्र बाजार समितीने आडत व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून देत कोरोना नियमांचे पालन करुन लिलाव सुरू ठेवला यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला तसेच नुकसानीपासून त्यांनाही मोठा दिलासा मिळाला होता. पालिका क्षेत्रात लिलाव होत असताना कुठल्याही सुविधा दिल्या जात नव्हत्या म्हणून अडत व्यापार्यांनी बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांना विनंती करून त्यांनी बाजार समिती परिसरात लिलावासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे तसेच सर्व प्रक्रिया आहे कायदेशीररित्या झाल्याचे नरेंद्र चौधरी यांनी सांगितले.
*अनामत रक्कम घेऊन गाळे विक्री
बाजार समिती परिसरातील गाळ्यांसाठी शासकीय अनामत 20 हजार रुपये घेऊन तीस वर्षांसाठी करार करण्यात आला आहे. जागेची गरज असतांना शेतकऱ्यांचा माल फेकून देण्यात आला होता त्यावेळेस आरोप करणारे कुठेही पुढे आले नव्हते मात्र आता बिनबुडाचे आरोप करीत आहे. शेतकऱ्यांचा पाच लाखाचा भाजीपाला कोरोना काळात फेकला गेला होता . त्यावेळेस कोणीही याविरोधात आवाज उचलला नव्हता मात्र आता फसवणुकीचा आरोप करून शेतकऱ्यांच्या मदत करणाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचे सचिव निलेश माळी यांनी सांगितले.
अन्यथा बेमुदत लिलाव बंद – इशारा
बाजार समितीच्या कारभारावर ज्या लोकांनी आरोप केले आहेत यासंदर्भात प्रांताधिकारी यांची भेट घेऊन त्यांना आम्ही एकत्रितपणे निवेदन देणार आहोत तसेच या रोपांची सखोल चौकशी करावी अन्यथा बेमुदत लिलाव बंद करून आंदोलनाचा इशारा विजय लोकवाणी यांनी दिला आहे सचिन चौधरी यांनी आडत विक्रेत्यांना मदत केली आहे त्यांच्यामुळेच आज अनेकांना रोजगाराचे साधन मिळाले आहे शासन नियमानुसार रीतसर पावती फाडून गाड्यांची विक्री झाली आहे यात कोणताही गैरव्यवहार झालेला नसून अतिशय प्रामाणिकपणे यात व्यवहार झाल्याचे लोकवाणी यांनी सांगितले


