भुसावळ आगारात एस.टी.महामंडळ कर्मचार्‍यांना किराणा किटचे वाटप – खासदार रक्षा खडसे यांचा पुढाकार : एस.टी.कर्मचारी कुटुंबाला मिळाला दिलासा

भुसावळ : एस.टी.मंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यातील एस.टी.कर्मचारी 27 ऑक्टोबर 2021 पासून संपावर उतले आहेत. या बेमुदत संपास पाठींबा देऊन भुसावळ आगारातील एस. टी. कर्मचार्‍यांना खासदार रक्षा खडसे यांनी किराणा किटचे वाटप केल्याने कर्मचार्‍यांच्या कुटूंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

एस.टी.कर्मचार्‍यांना किराणा किटमुळे दिलासा
एस.टी.महामंडळाच्या तुटपुंज्या व अनियमित वेतनामुळे राज्यातील अनेक एस.टी.कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात कोरोनानंतर आत्महत्येच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून त्यासाठी आर्थिक मागण्यांच्या पुर्ततेसाठी सुरू असलेल्या बेमुदत संपास इतके दिवस उलटूनही राज्य शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. राज्य शासनाच्या बेजबाबदारपणाचे भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर व तालुक्यातर्फे यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. भारतीय जनता पार्टी एस.टी.कर्मचार्‍यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या दुखवट्यात सहभागी आहे. एस.टी.कर्मचार्‍यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याबाबत यावेळी एस.टी.कर्मचार्‍यांना आश्वस्त करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी आमदार संजय सावकारे, भाजप तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, माजी नगरसेविका मीना लोणारी, प्रा.दिनेश राठी, सुनील महाजन, अजय नागराणी, राजेंद्र आवटे, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, अमोल महाजन, दिलीप कोळी, खुशाल जोशी, जयंत माहुरकर, संजय बोचरे, विलास अवचार, दुर्गेश कोलते, प्रशांत निकम, गौतम जोहरे, विनोद सोनवणे, नितीन पाटील, राहुल तायडे, अनिरुद्ध कुलकर्णी, केशव गेलानी, चेतन बोरोले, चेतन सावकारे, शिशीर जावळे, गोपीसिंग राजपूत, लोकेश जोशी, भाजपा कार्यकर्ते तसेच एस.टी.कर्मचारी यावेळी उपस्थित होते.