भुसावळ तहसिल कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन संपन्न :

भुसावळ – येथील तहसील कार्यालयाने राष्ट्रीय मतदार दिननिमित्त शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था भुसावळ येथे कार्यक्रम संपन्न झाला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी भुसावळ रामसिंग सुलाणे होते. कार्यक्रमास तहसिलदार
दिपक धिवरे, प्राचार्य व्हि.व्हि.राजूरकर , तसेच शिक्षक कर्मचारी विदयार्थी व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमधील विजेतांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच नवमतदारांना निवडणुक ओळखपत्र वाटप करण्यात आले.तसेच मुन्सिपल हायस्कुल यांच्या विदयार्थीनीने मतदार जनजागृती बाबत विशेष पथनाटय सादर केले. सदर कार्यक्रमाध्ये रामसिंग सुलाणे उपविभागीय अधिकारी यांनी लोकशाही बलशाली करण्यासाठी युवकांनी मतदान प्रक्रीयेमध्ये हिरारीने सहभाग होणेचे आवश्यकता असले बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले दीपक धिवरे तहसिलदार भुसावळ यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच प्राचार्य व्हि. व्हि . राजुरकर यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगद असटकर नायब तहसिलदार भुसावळ यांनी केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वि.एन. शिरसाठ यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश मुस्कावाड महसुल सहायक यांनी विशेष प्रयत्न केले.