भुसावळ – तालूका कृषी अधिकारी भुसावळ कार्यालयातील आत्मा योजनेमार्फत विक्रम पाटील यांचे शेतात कापूस पराटया पासून बायोडानामिक कंपोस्ट खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

बरेच शेतकरी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत कापसाला खत व पाणी भरून भरदड पिकाचे उत्पादन घेत राहतात, परंतु आज आपण प्रत्येक बोंड फोडून पाहिले तर त्यात आपल्याला गुलाबी बोंडअळी किड दिसत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांला खत, पाणी, मजुरी व वेळ देऊन देखील एकरी 3 क्विटल च्या वर कापसाचे उत्पादन मिळणार नाही त्याऐवजी शेतकऱ्यांनी कापसाचे पराटया काढून तेथे गहू किंवा हरभरा पेरल्यास त्यापासून निश्चितच 60,000 ते 70,000 रु उत्पादन मिळून बोंडअळी ची जीवनसाखळी तोडता येईल व शेताचे बिवाड पण बदल होईल.
असे किडग्रस्त गुलाबी बोंडअळी च्या पराटयाची विल्हेवाट लावणे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. त्यासाठी कापूस पराटयाची कुट्टी तयार करून त्यापासून कंपोस्टींग करून घेतले तर त्यापासून 60 दिवसात उत्तम पध्दतीचे 1 टन बायोडानामिक खत तयार करून घेतले तर शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवरील खर्च कमी होऊन जमीनीतील सेंद्रिय कर्ब व उपयुक्त जीवाणू वाढण्यास मदत होईल.


